Pandharpur Fire | पंढरपुरात फर्निचर दुकानाला भीषण आग, कोट्यवधींचं साहित्य जळून खाक
पंढरपूर येथील लिंक रोड परिसरातील एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागली या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे फर्निचरचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. लिंक रोड परिसरात महालक्ष्मी फर्निचरचे दुकान आहे. या दुकानाला मध्यरात्री दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली.
पंढरपूर येथील लिंक रोड परिसरातील एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागली या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे फर्निचरचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. लिंक रोड परिसरात महालक्ष्मी फर्निचरचे दुकान आहे. या दुकानाला मध्यरात्री दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीने रौद्र रुप धारण केल्याने काही वेळातच दुकानातील फर्निचरचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
आग लागल्याचे कळताच परिसरातील लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग मोठ्या प्रमाणात लागल्याने दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
Latest Videos