स्वातंत्र्यदिनानिमित्त विठुरायाला तिरंगी उपरणं अन् सुरेख पोशाख; पंढरपूरचं मंदिर पाना-फुलांनी सजलं

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर आज स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध फुलांचा आणि पानांचा वापर करून तिरंग्याची आरास करण्यात आली आहे. यासोबत विठ्ठल रुक्मिणीचा पोशाख देखील तिरंगी रंगाचा वापर करून करण्यात आला आहे

स्वातंत्र्यदिनानिमित्त विठुरायाला तिरंगी उपरणं अन् सुरेख पोशाख; पंढरपूरचं मंदिर पाना-फुलांनी सजलं
| Updated on: Aug 15, 2024 | 2:12 PM

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नामदेव पायरी, उत्तरद्वार, पश्चिमद्वार, श्री विठ्ठल रुक्मिणीचे कळस या ठिकाणी आकर्षक तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पंढरपूर मंदिर परिसर तिरंगामय झाला आहे. तर आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल मंदिरात विविध फुलांचा आणि पानांचा वापर करून तिरंग्याची आरास करण्यात आली आहे. पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांच्याकडून श्री विठ्ठल मंदिरात तिरंग्याची आरास करण्यात आली आहे. या दिवसाच्या निमित्ताने झेंडू, शेवंती आणि तुळशीच्या पानांचा वापर करुन देवाचा गाभारा, सोळखांबी, प्रवेश द्वार आणि मंदिराच्या सभा मंडपात तिरंग्याची आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विठ्ठलास चॉकलेटी रंगाचा अंगारखा पिवळ्या रंगाचे पितांबर आणि तिरंग्याचे उपरणे असा पोशाख करण्यात आला आहे.

Follow us
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.