Pandharpur | भाद्रपद शुद्ध परिवर्तनी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

Pandharpur | भाद्रपद शुद्ध परिवर्तनी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

| Updated on: Sep 17, 2021 | 10:25 AM

आज भाद्रपद शुध्द परिवर्तिनी एकादशी आणि गणेशोत्सव सुरु असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी आणि श्री गणेशाला प्रिय असणाऱ्या दुर्व्याच्या पेंड्यानी  सजवण्यात आले आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सव सुरु असल्याने या सजावटीमध्ये अष्टविनायक प्रतिमेचा देखील कल्पकतेने वापर केला आहे. ही सजावट रांजणगाव येथील विठ्ठलभक्त नानासाहेब पाचुंदकर यांनी केलीय.

आज भाद्रपद शुध्द परिवर्तिनी एकादशी आणि गणेशोत्सव सुरु असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी आणि श्री गणेशाला प्रिय असणाऱ्या दुर्व्याच्या पेंड्यानी  सजवण्यात आले आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सव सुरु असल्याने या सजावटीमध्ये अष्टविनायक प्रतिमेचा देखील कल्पकतेने वापर केला आहे. ही सजावट रांजणगाव येथील विठ्ठलभक्त नानासाहेब पाचुंदकर यांनी केलीय. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा सोळखांबी,चारखांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना दुर्व्याच्या पेंड्या, झेंडू, अष्टर, ग्लेंडर, तगर, केशरी झेंडू, निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे, पिवळा झेंडू अशा विविध आकर्षक अशा फुलांनी आणि दुर्व्याच्या पेंड्यांनी आरास करण्यात आली आहे. विविध रंगाच्या  फुलांनी आणि दुर्व्याच्या पेंड्यानी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. विठुरायाचे आजचे गोजिरे रुप अधिकच खुलून दिसत आहे.