Pandharpur Wari : वर्दीतल्या सिनिअर इन्सपेक्टरचा टाळ मृदुंगाचा गजर, पोलिसाचं हे अनोखं रुप होतंय व्हायरल
धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळंगावकर टाळ वाजविण्यात दंग असल्याचे दिसून आले आहे. विजय कांदळगावकर हे त्यांच्या चांगल्या कामासाठी आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात.
सध्या वरीसाठी सगळीकडे जोरदार तयारी करण्यात आलीय. टाळ मृदुंगाचा आवज पुन्हा ऐकण्यासाठी वारकरी आतुर झाले आहेत. काही दिंड्या रवानाही झाल्या आहेत. अशात एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळंगावकर टाळ वाजविण्यात दंग असल्याचे दिसून आले आहे. विजय कांदळगावकर हे त्यांच्या चांगल्या कामासाठी आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात.कोरोनाच्या काळात गरीब, मजूर आणि गरजूंना अन्नदान करण्यापासून, त्यांच्या राहण्याची योग्य व्यवस्था करणे, त्यांना रेशन देण्याचे काम त्यांनी केले होते. ज्यासाठी त्यांचा सन्मानही करण्यात आला असून, आता त्यांचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. वर्दीतल्या वारकऱ्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
Published on: Jun 19, 2022 09:57 PM
Latest Videos