Pankaja Munde : 'कमळच हाती घेतलं असतं तर बरं...', पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंसाठी घेतलेल्या सभेत व्यक्त केली खंत

Pankaja Munde : ‘कमळच हाती घेतलं असतं तर बरं…’, पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंसाठी घेतलेल्या सभेत व्यक्त केली खंत

| Updated on: Nov 11, 2024 | 12:23 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली आहे. या सभेत त्यांनी आता आपल्याला धनंजय मुंडेंना आमदार करायचं आहे. असं म्हणत त्यांना मत देण्याचं आवाहन जनतेला केलंय.

धनंजय मुंडे यांनी कमळच हाती घेतलं असतं तर बरं झालं असतं असं मोठं वक्तव्य भाजप नेत्या, विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केलंय. ते धनंजय मुंडे यांच्या प्रचारसभेत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. भाजपचं कमळ डोळ्यासमोर धरा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाचं बटण दाबा, असं आवाहनच पंकजा मुंडे यांनी मतदारांना केलंय. बीड जिल्ह्यातील परळीतून धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी धनंजय मुंडे त्यांच्या सोबत एकाच मंचावर असतानाच त्यांनी मनातील खंत व्यक्त केली. आम्ही एकमेकांना एकमेकांच्या विरोधात खूप ऊर्जा वाया घालवली असं सांगत असताना धनंजय मुंडे यांनी कमळाच्या चिन्हावर लढायला पाहिजे होतं, असं वक्तव्य करत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. आता आपल्याला धनंजय मुंडेंना आमदार करायचं आहे. या देशात अनेक परिवार एकमेव एकमेका विरुद्ध लढत आहेत. राजकारणाची पातळी अनेक जणांनी सोडली आहे. या निवडणुकीत आपण एक आहोत सर्वांना दाखवून द्यायचं आहे. सन्मानाची लढाई असते पैशाची सत्तेची नसते, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Published on: Nov 11, 2024 12:23 PM