Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या…
उद्या 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा आझाद मैदानावर संध्याकाळी 5.30 वाजता भव्य शपथविधी सोहळा होणार आहे. दरम्यान, यासंदर्भात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या...
भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, उद्या 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा आझाद मैदानावर संध्याकाळी 5.30 वाजता भव्य शपथविधी सोहळा होणार आहे. दरम्यान, यासंदर्भात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि भाजपला ऐतिहासिक यश मिळालं आहे. त्यानंतर आता विधिमंडळ गटनेता म्हणून एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा थपथ घेतील, त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली. यावेळी त्यांना आपली मंत्रिपदी वर्णी लागेल का? असा सवाल केला असता त्या म्हणाल्या, ‘यावर भाष्य करणं हे मला गरजेचं वाटत नाही. त्यावर भाजपचे वरिष्ठ नेते आणि भाजपची टीम ठरवेल.’