Pankaja Munde | राजकारण बिग बॉसचा खेळ झाल्यासारखं वाटायला लागलंय : पंकजा मुंडे

Pankaja Munde | राजकारण बिग बॉसचा खेळ झाल्यासारखं वाटायला लागलंय : पंकजा मुंडे

| Updated on: Nov 12, 2021 | 11:25 AM

‘सध्या राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते. आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे. तर दुसरीकडे दाऊत, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफिया हे सर्व विषय पुढे येत आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

 सध्या आर्यन खान प्रकरण आणि ड्रग्सवरून देशात जोरदार राजकारण सुरू आहे. विशेष:हा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. या सर्व प्रकारावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये विविध विकास कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमावेळी बोलत होत्या. या कार्यक्रमाला आमदार मोनिका राजळे आणि खासदार सुजय विखे यांची देखील उपस्थिती होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे.

विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष 

‘सध्या राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते. आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे. तर दुसरीकडे दाऊत, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफिया हे सर्व विषय पुढे येत आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे. हे सर्व महाराष्ट्रात कोण आणते असा प्रश्न विचारला जात नाही. याला आळा घालण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.