पंकजा मुंडेंचं 'सूचक' वक्तव्य !

पंकजा मुंडेंचं ‘सूचक’ वक्तव्य !

| Updated on: May 27, 2022 | 6:39 PM

त्यानंतर राज्याच्या राजकारणापासून काहीसं दूर गेलेल्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्यात सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.

बीड : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्या आणि माजी जलसंपदा, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर राज्याच्या राजकारणापासून (Politics) काहीसं दूर गेलेल्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्यात सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 20 जून रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. अशावेळी पंकजा मुंडे यांनी विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत सूचक वक्तव्य केलंय. मी विधान परिषदेवर (Vidhan Parishad) जावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय.