बीड लोकसभेच्या उमेदवारीबद्दल स्वतःच पंकजा मुंडे यांनी दिले संकेत, म्हणाल्या...

बीड लोकसभेच्या उमेदवारीबद्दल स्वतःच पंकजा मुंडे यांनी दिले संकेत, म्हणाल्या…

| Updated on: Mar 10, 2024 | 12:18 PM

बीड लोकसभा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. या लोकसभेत गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी हे सहा विधानसभा येतात. गेल्या निवडणुकीत बीडमध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांच्यात सामना झाला होता. यंदा कशी असणार परिस्थिती?

मुंबई, १० मार्च २०२४ : बीड लोकसभेत प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे याच उमेदवार असण्याची शक्यता आहे. स्वतः पंकजा मुंडे यांनी संकेतही दिल्याचे पाहायला मिळाले. प्रीतम मुंडे यांची जागा घेऊन आपण कधीच लढणार नाही, असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी बीडच्या उमेदवारीबद्दल संकेत दिलेत. बीड लोकसभा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. या लोकसभेत गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी हे सहा विधानसभा येतात. गेल्या निवडणुकीत बीडमध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांच्यात सामना झाला. यावेळी भाजपचा विजय झाला होता. मात्र तरी यंदा प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडे यांना तिकीट मिळण्याची संधी आहे. यापूर्वी बीड लोकसभा लढण्यास विरोध दर्शविणाऱ्या पंकजा मुंडे यांचे आता सूर बदलल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर बीड उमेदवारीबाबत पंकजा मुंडेंनी मोठे संकेत दिले आहेत.

Published on: Mar 10, 2024 12:18 PM