Pankaja Munde :पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना काय दिला सल्ला

Pankaja Munde :पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना काय दिला सल्ला

| Updated on: Jan 12, 2023 | 9:08 AM

मुंबई :  Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) जावून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांचा 3 जानेवारीला रात्री भीषण अपघात (Dhananjay Munde Accident) झाला होता. या अपघातानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी मुंबईत उपचारासाठी आणण्यात आलं होतं. तेव्हापासून […]

मुंबई :  Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) जावून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांचा 3 जानेवारीला रात्री भीषण अपघात (Dhananjay Munde Accident) झाला होता. या अपघातानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी मुंबईत उपचारासाठी आणण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच त्यांची रुग्णालयात जावून भेट घेतली होती. त्यानंतर आज पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाऊ धनंजय यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर पंकजा यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. आमचे रक्ताचे नाते, अशी वेळी आम्ही भेट घेणारच, त्यावेळी राजकारण बाजूला असते, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Published on: Jan 12, 2023 09:05 AM