Param Bir Singh | परमबीर सिंग यांनी निलंबनाचे आदेश स्वीकारले नाही ; सूत्रांची माहिती
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सध्या चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत, खडणीसारख्या गंभीर आरोपात परमबीर सिंह यांच्या चौकशी सुरू आहेत. त्यावरून सुरूवातीला त्यांचं निलंबनही करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह नंतर स्वत: अडचणीत सापडले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सध्या चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत, खडणीसारख्या गंभीर आरोपात परमबीर सिंह यांच्या चौकशी सुरू आहेत. त्यावरून सुरूवातीला त्यांचं निलंबनही करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह नंतर स्वत: अडचणीत सापडले. परमबीर सिंह यांच्यावरही नंतर अनेक गंभीर आरोप झाले, त्यानंतर परबीर सिंह काही काळ फरार झाल्याचं दिसून आलं. मात्र सुप्रीम कोर्टानं अटकेपासून दिलासा दिल्यानंतर परमबीर सिंह पुन्हा मुंबईत आले.
सचिन वाझेचं प्रकरण बाहेर आल्यानंतर परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या.आधी त्यांची तातडीने बदली करण्यात आली आणि नंतर खंडणी, अधिकाऱ्यांना जातिवाचक शिवीगाळ, बुकींकडे पैसे मागितल्याचे आरोप झाल्यानंतर परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं. मात्र हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. ठाकरे सरकारे सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात परमबीर सिंह कोर्टातही जाणार आहेत.