Parambir Singh | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित

| Updated on: Nov 17, 2021 | 7:56 PM

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आले आहे. मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांना फरार घोषित केलं आहे. गोरेगावच्या एका प्रकरणात सिंग यांना गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते. त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर राहिले नव्हते. सिंग यांच्यासह रियाज भाटी आणि विनायक सिंग यांनाही फरार घोषित करण्यात आलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गोरेगावातील वसुली प्रकरणात अनेक वेळा समन्स पाठवून हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, सिंग यांनी त्याला दाद दिली नाही. त्यामुळे गुन्हे अन्वेषण विभागाने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात सिंग यांना फरार घोषित करण्याबाबतचा अर्ज दिला होता. कोर्टाने हा अर्ज मंजूर केला आहे. सिंग यांच्यासह रियाज भाटी आणि विनय सिंग यांनाही कोर्टाने फरार घोषित केलं आहे. हे तिघे 30 दिवसाच्या आत कोर्टासमोर हजर न झाल्यास त्यांची संपत्ती जप्त केली जाणार आहे.