Paramvir Singh | परमबीर सिंग आज पदभार स्वीकारण्याची शक्यता-सूत्र
मुंबईसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आणि फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक परमवीरसिंह (Parambir singh) काल चंदिगडमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. परमवीर सिंह आज सकाळीच मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबईसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आणि फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक परमवीरसिंह (Parambir singh) काल चंदिगडमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. परमवीर सिंह आज सकाळीच मुंबईत दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्याने ते तत्काळ पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. परमवीर सिंह फरार होण्यापूर्वी ते राज्याच्या गृहरक्षक दलाच्या महासंचालक पदावर होते. मात्र त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर ते गायब झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांचा पदभार नागरि संरक्षण विभागाचे पोलीस महासंचालक के. वेंकटेशम यांच्याकडे देण्यात आला होता. या पदावर अद्याप राज्य सरकारने कुणाचीही नियुक्ती केली नाही. त्यामुळे परमवीर सिंह यांचा पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा आहे. लवकरच ते आपल्या पदाची जबाबदारी स्वीकरण्याची शक्यता आहे.