मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताय? परशुराम घाटाला पावसाचा फटका, वाहतुकीला धोका कारण....

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताय? परशुराम घाटाला पावसाचा फटका, वाहतुकीला धोका कारण….

| Updated on: Jul 22, 2024 | 12:59 PM

Mumbai Goa Highway Update : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घाटातील मातीच्या डोंगरांवरील दगड आणि माती थेट रस्त्यावर पडत आहे. तर डोंगरातून पाणी देखील रस्त्यावर कोसळत आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला मुसळधार पावसाचा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घाटातील मातीच्या डोंगरांवरील दगड आणि माती थेट रस्त्यावर पडत आहे. तर डोंगरातून पाणी देखील रस्त्यावर कोसळत आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. परशुराम घाटात मुसळधार पाऊस झाल्यास दरवर्षी दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडतांना दिसतात. यंदा देखील या घटनेचा धोका अधिक आहे. दरम्यान, परशुराम घाटात कोणत्याही अनपेक्षित घटना घडू नये म्हणून संरक्षण भिंतीचं काम करण्यात येत होते. मात्र ते अपूर्णच ठेवल्याचे पाहायला मिळतंय. तर परशुराम घाटात संरक्षक भिंत नसल्याने वाहतुकीला धोका निर्माण झालाय. तर पावसामुळे दगड आणि माती थेट रस्त्यावर पडत असल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

Published on: Jul 22, 2024 12:59 PM