मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटावर जीवघेणा प्रवास बघा व्हिडीओ

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटावर जीवघेणा प्रवास बघा व्हिडीओ

| Updated on: Feb 16, 2023 | 10:35 PM

VIDEO | मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीस धोकादायक, वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीस धोकादायक ठरला आहे. या घाटात जीव मुठीत घेऊन वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे. परशुराम घाटाचे डोंगर कटिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे बऱ्याचदा या ठिकाणी मोठे दगड मुख्यमार्गावरती येत असतात आणि वाहतूक ठप्प होत असते. डोंगराच्या शेजारी असणाऱ्या धामणदेवी गावाला देखील परशुराम घाटात कोसळणाऱ्या दरड, दगडींचा धडाका बसतो, यामुळे या ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. डोंगर कटिंगचे काम 60 टक्के पूर्ण झाले असून एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत या घाटामधून नवीन महामार्गाच्या काँक्रीटची एक लाईन पूर्ण होईल असा विश्वास हायवे प्रशासनाने व्यक्त केला आहे. जाणून घ्या, परशुराम घाटातील परिस्थितीचा आढावा व्हिडीओच्या माध्यमातून….