School | 85% पालकांची मुलांना शाळेत पाठवण्यास संमती, शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातील माहिती

School | 85% पालकांची मुलांना शाळेत पाठवण्यास संमती, शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातील माहिती

| Updated on: Jul 11, 2021 | 8:50 AM

सुधारित परिपत्रकामुळे शाळा कधी सुरु करायच्या याची स्पष्टता झाली आलीय. या परिपत्रकानुसार 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश सरकारने शाळांना दिलेत. असं असलं तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग कसे सुरू करावेत, याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना अद्याप दिलेल्या नाहीत.

85% पालकांची मुलांना शाळेत पाठवण्यास संमती, शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातील माहिती. सुधारित परिपत्रकामुळे शाळा कधी सुरु करायच्या याची स्पष्टता झाली आलीय. या परिपत्रकानुसार 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश सरकारने शाळांना दिलेत. असं असलं तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग कसे सुरू करावेत, याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना अद्याप दिलेल्या नाहीत. त्यामुळेच शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनामध्ये शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम कायम आहे.

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड म्हणाले, “शाळा प्राशासन अद्याप मार्गदर्शक सुचनांच्या प्रतिक्षेत‘‘शाळा नेमक्या कधी सुरू करायचा, याबाबत संभ्रम होता. पण आता त्याची स्पष्टता झाली. शाळा 15 जूनपासून सुरू होतील. परंतु शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या आहेत, याबाबत अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत.”

“दरवर्षी या परिपत्रकात प्रथम सत्र, द्वितीय सत्र, दिवाळी सुटीचा कालावधी असा तपशीलवार उल्लेख केलेला नाही. त्यामुळे शाळांना वर्षभरातील सुट्ट्यांचे, परिक्षांचे आणि इतर कामकाजाचे नियोजन करता येत नाही”, असं मत हरिश्चंद्र गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे.