Paris Olympics 2024 : विनेश फोगटची अपात्रता कायम राहणार की पदक मिळणार? CAS कोर्ट काय देणार निकाल?

Paris Olympics 2024 : विनेश फोगटची अपात्रता कायम राहणार की पदक मिळणार? CAS कोर्ट काय देणार निकाल?

| Updated on: Aug 08, 2024 | 6:21 PM

Paris Olympics 2024 : महिला कुस्तीपटून विनेश फोगटच्या याचिकेवर CAS कोर्टात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीची प्रक्रिया सुरू असून थोड्याच वेळात कोर्ट निकाल देणार आहे. विनेश फोगट हिची अपात्रता कायम राहणार की पदक मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीपटू विनेश फोगटने महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत अंतिम फेरीत दिली होती. पण अंतिम सामन्याच्या काही तास आधी तिचे वजन मोजण्यात आले तेव्हा ते ५० किलोग्रॅमपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे दिसून आले. यानंतर खेळाच्या नियमानुसार विनेश फोगटला अंतिम सामना खेळण्यास अपात्र घोषित करण्यात आले. यामुळे करोडो भारतीयांची निराशा झाली .दरम्यान अपात्रतेच्या निर्णयामुळे विनेश फोगटला रौप्य पदकही मिळणार नसल्याचे सिद्ध झाले. विनेश फोगटने तिच्या रौप्यपदकावर दावा करण्यासाठी CAS मध्ये अपील दाखल केले आहे. इतकेच नाहीतर विनेश फोगटने ५० किलो गटात रौप्यपदकाची मागणी केली आहे. दरम्यान, ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगटने तिच्या अपात्रतेविरुद्ध केलेले अपील कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) स्वीकारू शकते. याबाबतचा निर्णय गुरुवारी सायंकाळपर्यंत येऊ शकतो, अशीही माहिती मिळत आहे.

Published on: Aug 08, 2024 06:19 PM