Lok Sabha LIVE : लोकसभेचं कामकाज सुरू असताना ‘ते’ तिघे आत शिरले अन्…संसदेत उडाली एकच खळबळ
संसदेचं कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून दोन ते तीन जणं संसद भवनातील सभागृहात शिरले आणि एकच खळबळ संसद भवनातील परिसरात दोन तीन जणांनी फटाके फोडले आणि जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर सभागृहातील कामकाम सुरू असताना अचानक एक स्त्री आणि एक पुरुष प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात शिरले.
नवी दिल्ली, १३ डिसेंबर २०२३ : संसद भवनासंदर्भातील एक मोठी बातमी समोर येत आहे . संसदेचं कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून दोन ते तीन जणं संसद भवनातील सभागृहात शिरले आणि एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. संसद भवनातील परिसरात दोन तीन जणांनी फटाके फोडले आणि जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर सभागृहातील कामकाम सुरू असताना अचानक एक स्त्री आणि एक पुरुष प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात शिरले. कोणतीही परवानगी घेतली नसताना आणि सभागृहाचे सदस्यही नव्हते तरी हे दोघे घुसल्याने सुरक्षा रक्षकांसमोर काय करावे काय नाही हा सवाल उभा राहिला अन् त्यांची एकच तारांबळ उडाली. संसदेत खासदाराच्या पासवर हे दोघे शिरले. भारतमाता की जय, तानाशाही नही चलेगी अशा घोषणा दिल्या. ट्रान्स्पोर्ट भवनाच्या बाहेर गोंधळ घातला. त्यांनी पिवळ्या रंगाचा गॅसही सोडला नेमकं काय घडतंय याचा काही काळ कुणालाही नेम लागत नव्हता.