राज ठाकरे यांच्याकडून मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी, नेमकं कारण काय?
महेश जाधव यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यात वाद झाला होता. मात्र राज ठाकरे यांनी आता परशुराम उपरकर आणि प्रवीण मर्गज या दोन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी का केली?
मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४ : मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी कारवाई केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या मनसे या पक्षातून दोन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. परशुराम उपरकर आणि प्रवीण मर्गज अशी हकालपट्टी करण्यात आलेल्या दोन मनसे पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. अचानक तडका फडकी या दोन पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याने राजकीय वर्तुळात अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, मनसेने काही दिवसांपूर्वी पक्षाचे कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांचीदेखील हकालपट्टी केली होती. महेश जाधव यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यात वाद झाला होता. मात्र राज ठाकरे यांनी आता परशुराम उपरकर आणि प्रवीण मर्गज या दोन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी का केली? याचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही. मनसे नेते शिरीष सावंत यांनी याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे