“आम्ही सभेला स्वखर्चाने आलो”; पैठणमधील सभेविषयी कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात पैठणमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळतेय. लोकांच्या या गर्दीवरून अनेक आरोप करण्यात आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात पैठणमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळतेय. लोकांच्या या गर्दीवरून अनेक आरोप करण्यात आले होते. पैसे देऊन सभेला लोकांना बोलावल्याचा आरोप केला जात होता. सभेला उपस्थित कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. “आम्ही स्वखर्चाने या सभेला आलो आहोत”, अशी प्रतिक्रिया एकाने दिली. तर मुख्यमंत्र्यांच्या प्रेमापोटी आम्ही या सभेला हजर झालो आहोत, आम्हाला कुठलेच पैसे मिळाले नाहीत, असं दुसऱ्याने स्पष्ट केलं.
Published on: Sep 12, 2022 04:10 PM
Latest Videos