'त्या' एसटीच्या व्हायरल फोटोमुळं भूम आगारासाठी आनंदाची बातमी, बघा व्हिडीओ

‘त्या’ एसटीच्या व्हायरल फोटोमुळं भूम आगारासाठी आनंदाची बातमी, बघा व्हिडीओ

| Updated on: Mar 08, 2023 | 3:09 PM

VIDEO | धाराशिव मधील भूम आगारातील प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना मार्च अखेरपर्यंत मिळणार मोठा दिलासा, राज्य परिवहन महामंडळाने कोणता घेतला निर्णय

मुंबई : धाराशिवमधील भूम आगारातील मोडकी-तोडकी बस आणि त्यावर असलेली शिंदे सरकारची जाहिरात यामुळे या बसचा आणि सरकारी जाहिरातबाजीचा मुद्दा अधिवेशनात चांगलाच गाजल्याचे पाहायला मिळाले. मात्र अधिवेशनात चर्चेत आलेल्या धाराशिव भूम आगारातील कर्मचाऱ्यांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण भूम आगाराला १० नव्या एसटी बस देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर या मोडकळीस आलेल्या बससंबंधित काही कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन केले होते. त्यांचे निलंबन देखील मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात येत आहे.