Thane | जम्बो मेगाब्लॉकमध्ये प्रवाशांची रिक्षाचालकांकडून लूट, कळवा ते ठाणे पायी प्रवास
ठाणे ते दिवा (Thane to Diva)दरम्यान मध्य रेल्वेचा 72 तासाचा तीन दिवसीय मेगाब्लॉक (Mega blok) असल्याने पहिल्या दिवशी कळवा (Kalwa) स्थानकात प्रवाशांना हाल सोसावे लागले आहे.
ठाणे ते दिवा (Thane to Diva)दरम्यान मध्य रेल्वेचा 72 तासाचा तीन दिवसीय मेगाब्लॉक (Mega blok) असल्याने पहिल्या दिवशी कळवा (Kalwa) स्थानकात प्रवाशांना हाल सोसावे लागले आहे. लांब पल्ल्याच्या 100हून अधिक तर लोकल रेल्वे साडेतीनशेहून अधिक फेऱ्या रद्द केल्यामुळे स्लो ट्रॅकवर वेळापत्रक प्रमाणे लोकल गाड्या धावत नसल्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. जवळपास पंधरा ते वीस मिनिटे नंतर स्लो लोकल मिळत असल्याने रेल्वेमध्ये चढण्यासाठीदेखील प्रवाशांना कसरत करावी लागत आहे, तर दुसरीकडे रेल्वे प्रशासन आणि पालिकेच्यावतीने जास्तीत जास्त बसेस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रेल्वे प्रवाशी करत आहे. मात्र कळवा स्थानकाच्या बाहेर ठाण्याला जायला बस नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे कामावर जाताना नागरिकांना उशीर होत आहे.
Published on: Feb 05, 2022 12:30 PM