विलिनीकरण तर नाहीच, पण एसटीचे पगारही नाहीत, त्यामागचे खरे व्हिलन कोण? बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट!
VIDEO | येथे ST कर्माचाऱ्यांचे पगार होत नाही आणि कर्मचारी विलीनीकरणाच्या आशेवार, बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट!
मुंबई : एसटीच्या रखडलेल्या पगाराचे पैसे अखेर मंजूर झाले आहेत. मात्र त्याच विंवचनेतून सांगलीत एका एसटी चालकानं आत्महत्या केल्याचा आरोप होऊ लागला आहे. यावरुन विरोधक सरकारकडे बोट दाखवतायत., तसं गुणरत्न सदावर्ते यांनी आत्महत्येसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरुन ज्या अनेक नेत्यांसहीत पडळकरांनी रान उठवलं होतं. त्याच पडळकरांच्या सांगलीत काल एसटी ड्रायव्हरनं आत्महत्या केली. आत्महत्येमागे आर्थिक अडचणी, अनियमित पगार आणि परिस्थितीचं कारण सांगितलं जातंय. मात्र आज गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यावर प्रतिक्रिया देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. रखडलेल्या पगाराबद्दल काल राज्यातून अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर सरकारनं कोर्टात दिलेल्या हमीनुसार साडे तीन कोटी रुपये महामंडळाला दिले आहेत. त्यामुळे लवकरच एसटी कर्मचाऱ्यांना पगार होण्याची आशा आहे.