Special Report | यूपीतील हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा?
केंद्र सरकारच्या वतीने असदुद्दीन ओवैसी यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. नुकतीच याबाबत घोषणा करण्यात आली. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची झेड प्लस सुरक्षा असदुद्दीन ओवैसी यांना संपूर्ण देशभरात दिली जाईल, असे गृह मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, ओवेसी यांनी केंद्रानं देऊ केलेली झेड प्लस सुरक्षा नाकारल्याची माहिती मिळतेय.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगेलच तापले असताना गुरुवारी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर गाडीवर गोळीबार झाला. हापूर जिल्ह्यात प्रचारसभेहून परतत असताना त्यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशातील राजकारण मात्र आणखीच तापले. आता केंद्र सरकारच्या वतीने असदुद्दीन ओवैसी यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. नुकतीच याबाबत घोषणा करण्यात आली. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची झेड प्लस सुरक्षा असदुद्दीन ओवैसी यांना संपूर्ण देशभरात दिली जाईल, असे गृह मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, ओवेसी यांनी केंद्रानं देऊ केलेली झेड प्लस सुरक्षा नाकारल्याची माहिती मिळतेय.
गुरुवारी ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार
असदुद्दीन ओवैसी हे उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारावर आहेत. दरम्यान, गुरुवारी हापूर जिल्ह्यातून दिल्लीकडे जाताना अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केल्याचा आरोप ओवैसी यांनी केला. नॅशनल हायवे 24 च्या हापूर-गाझियाबाद फाट्यावरील छिजारसी टोल प्लाझाजवळ संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे ओवैसी यांनी सांगितले. AIMIM चे खासदार ओवैसी यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली. ट्वीटमध्ये ते म्हणाले, काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या गाडीवर गोळीबार झाला. या हल्ल्यात चार गोळ्या झाडल्या. ते 3-4 लोक होते. सगळेच पळाले असून शस्त्र त्यांनी जागेवरच सोडली. माझी गाडी पंक्चर झाली, पण मी दुसऱ्या गाडीत बसून तेथून निघालो. मी सध्या सुरक्षित आहे.’