Video | खडकवासला धरणावर पर्यटकांची गर्दी, लोकांना कोरोना नियमांचा विसर
शनिवार तसेच रविवारी पोलिसांची नाकाबंदी असते. मात्र, पोलीस नसल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे सध्या दिसत आहे.
पुणे : कोरोनाला थोपवण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पर्यटनस्थळांवर कलम 144 म्हणजेच संचारबंदी लागू केलेली आहे. मात्र, आषाढी एकादशीनिमित्त असलेली सुट्टी तसेच मागील दोन दिवसांपासून झालेला पाऊस यामुळे पुण्यातील खडकवासला धरणावर पर्यटकांनी गर्दी केली. येथे लोकांची ये-जा सुरु आहे. येते शनिवार तसेच रविवारी पोलिसांची नाकाबंदी असते. मात्र, पोलीस नसल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे सध्या दिसत आहे.
Latest Videos