हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ

हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ

| Updated on: May 29, 2024 | 1:27 PM

पेठ तालूक्यातील काहनडोळपाडा गावातील सार्वजनिक विहिरीवर पाण्यासाठी महिलांसह पुरुषांची पाणी मिळवण्यासाठी दिवसा गर्दी होतच असते. मात्र आता तर रात्रीच्या वेळेस सुध्दा महिला हंडाभर पाण्यासाठी या विहिरीवर धाव घेत पाणी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला दिसत आहे.

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील पेठ तालुक्यातील जनतेला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सर्वात जास्त पाऊस या तालुक्यात पडत असला तरी उन्हाळा सुरु होताच या तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत आहे. पेठ तालूक्यातील काहनडोळपाडा गावातील सार्वजनिक विहिरीवर पाण्यासाठी महिलांसह पुरुषांची पाणी मिळवण्यासाठी दिवसा गर्दी होतच असते. मात्र आता तर रात्रीच्या वेळेस सुध्दा महिला हंडाभर पाण्यासाठी या विहिरीवर धाव घेत पाणी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.अशीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या पहावयास मिळत असून जो पर्यंत दमदार पाऊस होत नाही तो पर्यंत नागरीकांना पाण्यासाठी अशीच कसरत करायची वेळ येणार आहे. मात्र तूर्तास तरी विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ या महिलांची पाहायला मिळत आहे.

Published on: May 29, 2024 01:27 PM