1 फेब्रूवारीपासून महाराष्ट्रात 50% क्षमतेनं तमाशासाठी परवानगी -Tv9

1 फेब्रूवारीपासून महाराष्ट्रात 50% क्षमतेनं तमाशासाठी परवानगी -Tv9

| Updated on: Jan 24, 2022 | 9:43 PM

पुण्यातील रुग्णवाढ हळूहळू नियंत्रणात येत असल्याचं दिसून आल्यामुळे अखेर जमावबंदीचं कलम 144 रद्द करण्यात आलं आहे. तसेच 1 फेब्रुवारीपासून राज्यात तमाशाला 50 टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे.

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona Third Wave in Pune) पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक नियम कडक करण्यात आले होते. कोरोनाची लाट आणि वाढता संसर्ग रोखण्यासाठी पर्यटन स्थळांसह कलम 144 देखील लागू करण्यात आलं होतं. अखेर आता पुण्यातील रुग्णवाढ हळूहळू नियंत्रणात येत असल्याचं दिसून आल्यामुळे अखेर जमावबंदीचं कलम 144 रद्द करण्यात आलं आहे. तसेच 1 फेब्रुवारीपासून राज्यात तमाशाला 50 टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे. तसंच पुणे पुन्हा एकदा निर्बंधांतून शिथिल होत असून पर्यटन स्थळांसह अनेक गोष्टी आजपासून पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेनं सुरु होणार आहेत. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh) यांनी तशी माहितीही रविवारी संध्याकाळी जारी केली होती. दरम्यान मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणे, सॅनिटायझेन याबाबतच्या नियमांचंही काटोकेरपणे पालन करणं बंधनकारक असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी म्हटलंय. गेल्या 15 दिवसांच्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेऊन अखेर पुण्यासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.