राज्यातील पहिल्या बैलगाडा शर्यतीला परवानगी, लांडेवाडीत होणार पहिली शर्यत
सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवरील बंद उठवल्यानंतर राज्यात पुन्हा बैलगाडा शर्यातीचा धुरळा उडण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगावमधील लांडेवाडीत बऱ्याच वर्षांनी बैलगाडा शर्यत पहायला मिळणार आहे.
पुणे : सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवरील बंद उठवल्यानंतर राज्यात पुन्हा बैलगाडा शर्यातीचा धुरळा उडण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगावमधील लांडेवाडीत बऱ्याच वर्षांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे, या शर्यतीला प्रशासनाकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेत पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार असल्याचे निश्चित झाले आहे. यंदा नववर्षाची सुरूवातच जंगी होणार आहे, कारण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीला ही शर्यत होणार आहे. आंबेगावमधील लांडेवाडीत दरवर्षी शितळादेवीची यात्रा भरते, या यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे.
Latest Videos