Pandharpur |श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सोने, चांदीचे दागिने वितळवण्यास राज्य सरकारची परवानगी
मंदिर समितीने शासनाच्या न्याय व विधी विभागाला सुमारे 19 किलो वजनाच्या सोन्याच्या अणि 950 किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू वितळवून त्यातून नवीन अलंकार करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र शासनाने सोने आणि चांदी वितळवून ठेवण्यास परवानगी दिली आहे.
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 1985 पासून भाविकांनी सोने आणि चांदीच्या अनेक लहान लहान वस्तू, दागिने देवाला अर्पण केल्या आहेत. मंदिर समितीने शासनाच्या न्याय व विधी विभागाला सुमारे 19 किलो वजनाच्या सोन्याच्या अणि 950 किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू वितळवून त्यातून नवीन अलंकार करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र शासनाने सोने आणि चांदी वितळवून ठेवण्यास परवानगी दिली आहे. नुकत्याच झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत सोने, चांदी वितळवून सोन्याची वीट करण्या एवजी देवाला घालण्यासाठी त्या सोन्या चांदीतून अलंकार तयार करण्याचा निर्णय घेण्यात अला होता. मंदिर समितीचे माजी कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी शासनाकडे यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या बदली नंतर नूतन कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन अणि संबंधितांशी बोलणे देखील केले होते. त्यानुसार आता शासनाने मदिर समितीस सोने चांदी वितळविण्यास परवानगी दिली आहे.