शाहरुख खानच्या अडचणीत वाढ, लाच दिल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल!
समीर वानखेडे खंडणी प्रकरणात शाहरुख खान यालाही आरोपी करा या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. लवकरच या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी अपेक्षित आहे. वकील निलेश ओझा यांनी ही याचिका दाखल केली आहे .
मुंबई : समीर वानखेडे खंडणी प्रकरणात शाहरुख खान यालाही आरोपी करा या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. लवकरच या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी अपेक्षित आहे. वकील निलेश ओझा यांनी ही याचिका दाखल केली आहे .समीर वानखेडे कथित खंडणी वसुली प्रकरणात शाहरुख खान याला ही आरोपी करा या मागणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे . समीर वानखेडे प्रकरणात सीबीआयने एकूण 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे . त्या एफआयआरमध्ये शाहरुख खान याने 50 लाख रुपये लाच दिल्याचं म्हटलं आहे. मात्र लाच प्रतिबंधक कायद्यानुसार लाच मागणे आणि लाच देणारा हे दोघे दोषी असतात . शाहरुख खान याने लाच दिली आहे, यामुळे त्याला ही आरोपी करावं, अशी याचिकाकर्ते यांची मागणी आहे. याचिकाकर्ता राशीद खान पठाण यांच्या वतीने वकील निलेश ओझा यांनी मुंबई हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे .