7 दिवसांत पेट्रोल 4.40 रुपयांनी महागलं

| Updated on: Mar 29, 2022 | 10:49 AM

पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीत आज सातव्या दिवशीही वाढ करण्यात झाली आहे. ही पेट्रोलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात 70 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीत आज सातव्या दिवशीही वाढ करण्यात झाली आहे. ही पेट्रोलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात 70 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज ही वाढ झाल्याने भारतातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने आता 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामध्ये दिल्ली (Dehli), मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये या शहरांचा समावेश आहे. राजधानीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 100.21 रुपये आणि 91.47 रुपये प्रति लिटर आहेत. तर मुंबईत आता पेट्रोल 115.04 रुपये आणि डिझेल 99.25 रुपये दराने विकले जात आहे.चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 76 पैशांनी वाढला असून तो आता 105.94 रुपये आणि डिझेल 96 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 109.68 रुपये आणि डिझेल 94.62 रुपये आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर पेट्रोल डिझेलचे दर भारतात सातत्याने वाढत आहेत. काही दिवसांपुर्वी नामांकित दुधाच्या किमतीत देखील वाढ झाली. त्यानंतर एलपीजी सिलेंडरमध्ये चक्क 50 रूपयांनी वाढ करण्यात आली. सातत्याने होत असलेल्या दरवाढी विरोधात विरोधकांकडून सातत्याने केंद्र सरकारवरती टीका केली जात आहे.

Published on: Mar 29, 2022 10:49 AM