पेट्रोल, डिझेल दरात शिंदे-फडणवीस सरकारकडून कपात, मात्र गॅस दराचं काय?

पेट्रोल, डिझेल दरात शिंदे-फडणवीस सरकारकडून कपात, मात्र गॅस दराचं काय?

| Updated on: Jul 15, 2022 | 12:42 PM

राज्यात सत्ताबदल होताच केंद्रातील भाजप सरकारच्या निर्देशानुसार राज्यात इंधनावरील करकपातीमुळे पेट्रोल 5 रुपये, तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

राज्यात सत्ताबदल होताच केंद्रातील भाजप सरकारच्या निर्देशानुसार राज्यात इंधनावरील करकपातीमुळे पेट्रोल 5 रुपये, तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश या भाजपशासित राज्यांच्या तुलनेत ही कपात कमीच आहे. ही कपात मध्यरात्रीपासून अमलात आली. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोलवरील करात प्रतिलिटरला 5 रुपये तर डिझेलवरील करात 3 रुपये कपात करण्यात आली. पेट्रोल, डिझेल दरात कपात झाली असली अतरी गॅस दराचं काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

Published on: Jul 15, 2022 12:42 PM