Fuel Price | राज्यात पेट्रोल स्वस्त होण्याची चिन्हं

Fuel Price | राज्यात पेट्रोल स्वस्त होण्याची चिन्हं

| Updated on: Nov 08, 2021 | 8:48 AM

ट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.01 रुपये आणि डिझेलची किंमत 86.71 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.96 आणि 94.13 रुपये प्रतिलीटर इतका आहे.

राज्यात पेट्रोल स्वस्त होण्याची चिन्हं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर निर्णय होणार. सरकारी पेट्रोलियम कंपन्या IOC, HPCL आणि BPCL ने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.01 रुपये आणि डिझेलची किंमत 86.71 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.96 आणि 94.13 रुपये प्रतिलीटर इतका आहे.