Nagpur Winter Session 2023 : शिंदे सरकारचं शेवटचं अधिवेशन? विधानभवनाच्या पायऱ्यांवरील फोटोसेशनमध्ये कोण-कोण हजर?
हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असून सभागृहात अनेक मुद्यावर चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज विधानभवन परिसरात विधानभवनाच्या पायऱ्यांवर सर्वपक्षीय नेत्यांनी फोटोसेशन केल्याचे पाहायला मिळाले. या फोटोसेशनमध्ये कोण-कोण हजर?
नागपूर, १४ डिसेंबर २०२३ : नागपूर येथे राज्याच्या विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असून सभागृहात अनेक मुद्यावर चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज विधानभवन परिसरात विधानभवनाच्या पायऱ्यांवर सर्वपक्षीय नेत्यांनी फोटोसेशन केल्याचे पाहायला मिळाले. या फोटोसेशनमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी झाले आहेत. नागपूर येथील होत असलेलं हे शिंदे सरकारचं शेवटचं अधिवशेन आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे फोटोसेशन सुरू आहे. या फोटोसेशनमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील उपस्थिती दर्शविली तर आदित्य ठाकरे विधानभवनात हजर असतानाही आदित्य ठाकरे या फोटोसेशनमध्ये दिसले नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहेत. बघा कोण-कोण होते फोटोसेशनला हजर? भाजप नेत्यांच्या बाजूला काँग्रेसचे नेते, अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बाजूला काँग्रेसचे नेते?