भररस्त्यात दहशत माजवणाऱ्या गुंडांची धिंड, पिंपरी-चिंचवडच्या सांगवी परिसरातील घटना
पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे निलख परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना हातात कोयता घेऊन मारहाण करणाऱ्या गाव गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. जिथे ही घटना घडली, त्याच रस्त्यावर सांगवी पोलिसांनी दोन्ही आरोपींची धिंड काढल्याचं समोर आलं आहे. | Pimpri Chinchwad Crime Pune Sangvi Police allegedly made Goons Parade
पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे निलख परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना हातात कोयता घेऊन मारहाण करणाऱ्या गाव गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. जिथे ही घटना घडली, त्याच रस्त्यावर सांगवी पोलिसांनी दोन्ही आरोपींची धिंड काढल्याचं समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांची धिंड काढल्याचा आरोप याआधीही झाला होता. दोन दिवसांपूर्वी पिंपळे निलखच्या ज्या रस्त्यावर दारु पिऊन प्रतीक खरात, चेतन जावरे यांनी सर्वसामान्यांना वेठीस धरून कोयत्याने मारहाण केली होती, त्याच रस्त्यावर सोमवारी सांगवी पोलिसांनी या दोन्ही आरोपीची धिंड काढून चांगलाच धडा शिकवला. मात्र सांगवी पोलिसांशी संपर्क साधला असता त्या आरोपींना घेऊन घटनास्थळ पाहण्यासाठी गेलो असता कुणी तरी व्हिडीओ तयार केला, असा दावा करण्यात आला. | Pimpri Chinchwad Crime Pune Sangvi Police allegedly made Goons Parade