Pimpri | पिंपरीत दहशत माजवणाऱ्या कोयता भाईची पोलिसांनी काढली धिंड
कोयता हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोयता भाई राकेश सरोदे उर्फ यम भाईची पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात वरातच काढली आहे. आरोपीने ज्या भागात दहशत निर्माण केली त्याच भागात पोलिसांनी त्याची वरात काढली.
कोयता हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोयता भाई राकेश सरोदे उर्फ यम भाईची पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात वरातच काढली आहे. आरोपीने ज्या भागात दहशत निर्माण केली त्याच भागात पोलिसांनी त्याची वरात काढली. या यम भाईने सोशल मीडियावर हातात कोयता घेऊन एक इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. आमची सूत्रे येरवडा जेलमधून हालतात, असं तो व्हिडीओत म्हणाला होता. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
Published on: Jul 15, 2021 08:42 PM
Latest Videos