VIDEO : Ambarnath | अंबरनाथ शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य, भाजप घालणार पालिकेचं श्राद्ध

VIDEO : Ambarnath | अंबरनाथ शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य, भाजप घालणार पालिकेचं श्राद्ध

| Updated on: Oct 06, 2021 | 12:26 PM

अंबरनाथ शहरात काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या समस्येकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्यानं भाजपकडून या खड्ड्यांमध्येच सर्वपित्रीच्या दिवशी पालिकेचं श्राद्ध घातलं जाणार आहे. त्यासाठी भाजपनं थेट पालिका अधिकाऱ्यांनाच आमंत्रण दिलं आहे.

अंबरनाथ शहरात काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या समस्येकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्यानं भाजपकडून या खड्ड्यांमध्येच सर्वपित्रीच्या दिवशी पालिकेचं श्राद्ध घातलं जाणार आहे. त्यासाठी भाजपनं थेट पालिका अधिकाऱ्यांनाच आमंत्रण दिलं आहे. अंबरनाथ शहरात सध्या बहुतांशी रस्ते सिमेंट काँक्रीटचे झालेले असले तरी काही रस्ते अजूनही डांबराचे आहेत. त्यांची अवस्था सध्या बिकट आहे. अंबरनाथ शहराकडून लोकनगरीमार्गे एमआयडीसीकडे जाणारा मुख्य रस्ता, लक्ष्मीनगरकडून गॅस गोडाऊनमार्गे नवरे नगरकडे जाणारा रस्ता या रस्त्यांची सध्या खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे.