Special Report | लता दीदींच्या अंत्यविधीला राजकीय संस्कृतीचं दर्शन! -tv9
गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी महाराष्ट्राच्या या संस्कृतीचे दर्शन घडले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चालताना थोडा त्रास होतो. त्यामुळे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते पीयूष गोयल हे शरद पवार यांचा हात हातात घेऊन चालताना दिसले. अन् महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती महान आणि प्रगल्भ असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं.
मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे दोघेही नेते राजकारणात एकमेकांवर तुटून पडायचे. पण या दोघांमध्ये व्यक्तिगत पातळीवर स्नेह होता. घरोबा होता. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे असोत की भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन हे सुद्धा शरद पवारांचे राजकीय वैरी होते. पण व्यक्तिगत पातळीवर या नेत्यांचे चांगले संबंध होते. कोणतीही व्यक्तिगत कटुता नव्हती. अनेकदा निवडणुकीच्या रणमैदानात एकमेकांवर तुटून पडणारे राज्यातील नेते अडचणीच्या काळात मात्र एकमेकांसाठी धावून जाताना उभ्या महाराष्ट्राने पाहिले. एकमेकांच्या घरचे लग्न सोहळे असो, सुख-दु:खाचे प्रसंग असो राज्यातील नेते एकमेकांच्या मदतीला नेहमीच धावून गेले. गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी महाराष्ट्राच्या या संस्कृतीचे दर्शन घडले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चालताना थोडा त्रास होतो. त्यामुळे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते पीयूष गोयल हे शरद पवार यांचा हात हातात घेऊन चालताना दिसले. अन् महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती महान आणि प्रगल्भ असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं.