MNS News : मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
MNS Recognition Cancellation : मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतलेल्या राज ठाकरे यांच्या पक्षाची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. हिन्दी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उल्लेख या याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे. राज ठाकरे यांच्या भडकाऊ भाषणांमुळे असे हल्ले होत असल्याचा आरोप याचिकाकर्ते सुनिल शुक्ला यांनी केला आहे. सुनिल शुक्ला हे उत्तर भारतीय विकास सेना प्रामुख आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे खासदार राजेश वर्मा यांच्याकडून देखील हिन्दी भाषिकांवरील हल्ल्याचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला आहे.
Published on: Apr 08, 2025 11:35 AM
Latest Videos

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'

पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?

'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?

पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
