कृपया महाराष्ट्रातील जनतेनं गैरसमज करून घेऊ नये - बंडखोर आमदार

कृपया महाराष्ट्रातील जनतेनं गैरसमज करून घेऊ नये – बंडखोर आमदार

| Updated on: Jun 29, 2022 | 11:59 AM

राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आज पाच वाजता या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, उद्या बहुमत सिद्ध करावे असे म्हटले आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी सरकारने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. आज पाच वाजता या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दरम्यान काही बंडखोर आमदार ( Rebel MLA)आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं त्याला प्रत्युत्तर देताना कोण संपर्कात आहे त्यांची नावे सांगा असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. आता मात्र गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटातील (Shinde Group) काही आमदारच मी स्वतःच्या मर्जीने गुवाहाटीला आल्याचं व्हिडीओ मार्फत सांगताना दिसून येतायत. याच संदर्भांतला ज्ञानराज चौगुले यांचा व्हिडीओ समोर आलाय…

Published on: Jun 29, 2022 11:59 AM