चिखलातून बैलांच्या खिल्लारी जोडी पळावल्या; पाहा कोकणातील नांगरणीच्या स्पर्धेची खास ड्रोन दृश्ये
संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली गावात सामुहिक नांगरणीची स्पर्धा रंगली. भल्या मोठ्या शेतातल्या चिखलातून बैलांची खिल्लारी जोडी पळवल्या. शेतकरी राज्याच्या मनोरंजनासाठी आणि त्याच्या विरंगुळ्यासाठी इथं स्पर्धा रंगते.
रत्नागिरी, 07 ऑगस्ट, 2023 | संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली गावात सामुहिक नांगरणीची स्पर्धा रंगली. भल्या मोठ्या शेतातल्या चिखलातून बैलांची खिल्लारी जोडी पळवल्या. शेतकरी राज्याच्या मनोरंजनासाठी आणि त्याच्या विरंगुळ्यासाठी इथं स्पर्धा रंगते. या स्पर्धेत पन्नास हुन अधिक बैल जोड्यांचा सहभाग होता.सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या रत्नागिरीत ही अनोखी स्पर्धा पार पडली. कालबाह्य सामुहिक शेतीला बहर आणण्यासाठी स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. 35 सेकंदापासून ते 50 सेकंदात या खिल्लारी बैल जोडीच्या माध्यमातून शेतात नांगरणी केली जाते. अंगावर काटा आणणाऱ्या या नागरिणीच्या स्पर्धेत काही सेकंदात नांगरणी करायची असते.काही संकेदाच्या फरकानं नांगरणी करणाऱ्या बळीराजाची आपल्या बैलजोडीसोबतची स्पर्धा तब्बल पाचतासाहून अधिक काळ रंगते.घाटी बैल आणि गावठी बैलाच्या माध्यमातून हि नांगरणी होते.स्पर्धा पाहण्यासाठी लोकांची ही तुफान गर्दी होती.