दोन दिवसात सहा सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींचा काँग्रेसवर घणाघात काय?

दोन दिवसात सहा सभा… मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींचा काँग्रेसवर घणाघात काय?

| Updated on: May 01, 2024 | 10:56 AM

दोन दिवसात मोदींनी राज्यात सहा सभा घेतल्या. सोलापूर, पुणे, माळशिरस, कराड, धाराशिव आणि लातूरमध्ये मोदींच्या सभेत दोन मुद्दे कायम राहिले ते म्हणजे एसटी आणि एससी आरक्षणासह मंगळसूत्र, संपत्ती आणि सोनं हिसकावून मुस्लिमांना देणार. काँग्रेसच्या घोषणापत्रात एसटी आणि एससी आरक्षणासह संपत्तीवरून नेमकं काय म्हटलं ते ही पहा....

महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा होतायंत. दोन दिवसात मोदींनी राज्यात सहा सभा घेतल्या. सोलापूर, पुणे, माळशिरस, कराड, धाराशिव आणि लातूरमध्ये मोदींच्या सभेत दोन मुद्दे कायम राहिले ते म्हणजे एसटी आणि एससी आरक्षणासह मंगळसूत्र, संपत्ती आणि सोनं हिसकावून मुस्लिमांना देणार. या सभेतून मुस्लीम आरक्षणापासून ते मंगळसूत्रावरून काँग्रेसवर आरोप होतांना दिसताय. एसटी आणि एससी आरक्षण काँग्रेस मुस्लीमांना देणार तसेच महिलांचं मंगळसूत्र देखील काँग्रेस हिसकावून मुस्लिमांना देईल असाही हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला. इतकंच नाहीतर ही टीका करताना मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचाच दाखला दिलाय. काँग्रेसच्या घोषणापत्रात एसटी आणि एससी आरक्षणासह संपत्तीवरून नेमकं काय म्हटलं ते ही पहा….बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: May 01, 2024 10:56 AM