मोदींना रोज उठून लोकशाहीचे धडे कोण देतंय? वाचा मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील काही लोक मला रोज उठून लोकशाहीचे धडे देत असल्याचं म्हणत राहुल गांधींना अप्रत्यक्ष टोला लगावला.

मोदींना रोज उठून लोकशाहीचे धडे कोण देतंय? वाचा मोदी काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 3:06 PM

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील नागरिकांसाठी केंद्र सरकारची आयुष्मान भारत (PM-JAY SEHAT) आरोग्य योजना लागू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. राहुल गांधींनी कृषी कायद्याविरोधात बोलताना भारतात लोकशाही आता केवळ बोलण्यापुरती राहिल्याची टीका केली होती. याला उत्तर देताना मोदींनी दिल्लीतील काही लोक मला रोज उठून लोकशाहीचे धडे देत असल्याचा टोला लगावला (PM Modi criticize Rahul Gandhi over lessons of Democracy in India ).

नरेंद्र मोदी म्हणाले, ”जम्मू काश्मीर केंद्र शासित प्रदेश झाल्यानंतर एका वर्षातच तिन्ही स्तरावरील पंचायत निवडणुका झाल्या. मात्र, दिल्लीमध्ये काही लोक रोज सकाळ संध्याकाळ माझ्यावर टीका करतात, मला दोषी ठरवतात. माझ्याविरोधात अपशब्द वापरतात. ते दररोज मला लोकशाही शिकवत असतात, रोज नवनवे धडे सांगत असतात. मी आज या लोकांना आरसा दाखवणार आहे.”

“जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेश झाल्यावर कमीत कमी वेळत तेथे तिन्ही स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुका झाल्या. तेथे पंचायत राज सुरु आहे. दुसरीकडे पुडुचेरीमध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. जे मला लोकशाही शिकवतात त्यांचंच तेथे सरकार आहे. सुप्रीम कोर्टाने 2018 मध्ये तेथे निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, आतापर्यंत निवडणुका झाल्या नाहीत. 2006 नंतर तेथे निवडणुकाच झाल्या नाहीत. काही राजकीय पक्षांच्या करणी आणि कथनीत किती फरक आहे हे यावरुन लक्षात येते.”

हेही वाचा : 

2 दिवस अधिवेशन घेऊन आम्ही पळपुटे, मग मोदींना काय म्हणाल? उदय सामंतांचा भाजपला सवाल

शेतकऱ्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षांची बंदूक : पंतप्रधान मोदी

कोरोनाची लस सर्वांना मिळेल?, लस मोफत असेल?, लसीकरणाबाबत पंतप्रधानांची नेमकी भूमिका काय?; राहुल गांधींचे तीन सवाल

PM Modi criticize Rahul Gandhi over lessons of Democracy in India

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.