'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे', शिवसेनेच्या जाहिरातीत फडणवीसांपेक्षा शिंदे लोकप्रिय असल्याचा दावा

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, शिवसेनेच्या जाहिरातीत फडणवीसांपेक्षा शिंदे लोकप्रिय असल्याचा दावा

| Updated on: Jun 13, 2023 | 11:10 AM

राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वे झाला आहे. त्या सर्वेची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई : राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वे झाला आहे. त्या सर्वेची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के जनतेने पसंती दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे जास्त लोकप्रिय असल्याचे जाहिरातीत म्हटले आहे. एका खासगी वाहिनीच्या सर्वेच्या आधारे शिवसेनेच्या जाहिरातीत दावा करण्यात आला आहे. जाहिरीतीत नेमकं काय? यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jun 13, 2023 11:10 AM