सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून मोठी ऑफर

सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त… मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून मोठी ऑफर

| Updated on: May 10, 2024 | 3:35 PM

बाळासाहेब ठाकरेंना मी जवळून पाहिलं आहे. बाळासाहेबांना आज किती दु:ख होत असेल.... उद्धव ठाकरे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निशाणा... तर यावेळी नंदुरबार येथे जाहीर सभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवार आणि उद्धव ठाकरेंना एक मोठी ऑफर दिली आहे. बघा काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि शरद पवारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत या सर्व स्वप्न पूर्ण होतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. नंदुरबार येथे जाहीर सभेत मोदींनी पवार आणि ठाकरेंना ही ऑफर दिली आहे. सभेतून मोदी म्हणाले, बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत आहेत. नकली शिवसेना, राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याच मन बनवलं आहे. इतकंच नाही तर शरद पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील, असं वक्तव्य करत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका करत त्यांना एक ऑफर सुद्धा दिली आहे. मोदी असेही म्हणाले की, नकली शिवेसना मला गाडण्याची भाषा करत आहे. बाळासाहेब ठाकरेंना मी जवळून पाहिलं आहे. बाळासाहेबांना आज किती दु:ख होत असेल, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Published on: May 10, 2024 03:21 PM