Special Report | 'कोरोना स्प्रेडर'वरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना मविआचा घेराव! -tv9

Special Report | ‘कोरोना स्प्रेडर’वरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना मविआचा घेराव! -tv9

| Updated on: Feb 08, 2022 | 8:48 PM

राज्यातील भाजप नेत्यांना महाराष्ट्राप्रति थोडीफार आस्था असेल तर त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करावा अन्यथा महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची ‘महाराष्ट्र द्रोही’ म्हणून नोंद केली जाईल अशी घणाघाती टीकाही पटोले यांनी केली. काल मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला होता. मुंबईत काँग्रेसने कोरोना फैलावण्यासाठी मजुरांना त्यांच्या गावी पाठवले. त्यासाठी मजुरांना पैसे दिले होते, असा आरोप मोदींनी केला होता.

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धन्यवाद प्रस्तावावर काल बोलताना महाराष्ट्राचा अपमान केला. हा महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा अपमान आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान आहे. त्यामुळे मोदींनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी. मोदींनी माफी न मागितल्यास उद्या राज्यभरात भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदोलने केली जातील, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे. तसेच राज्यातील भाजप नेत्यांना महाराष्ट्राप्रति थोडीफार आस्था असेल तर त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करावा अन्यथा महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची ‘महाराष्ट्र द्रोही’ म्हणून नोंद केली जाईल अशी घणाघाती टीकाही पटोले यांनी केली. काल मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला होता. मुंबईत काँग्रेसने कोरोना फैलावण्यासाठी मजुरांना त्यांच्या गावी पाठवले. त्यासाठी मजुरांना पैसे दिले होते, असा आरोप मोदींनी केला होता.