Independence Day 2024 : नरेंद्र मोदींना ‘गार्ड ऑफ ऑनर’, लाल किल्ल्यावर अशी झाली पंतप्रधानांची एन्ट्री
पंतप्रधान मोदींनी 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी सलग 11व्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यासह त्यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी विकसित भारत 2047 चा उल्लेख केला. तत्पूर्वी, त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला
देशभरात आज ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 11व्यांदा दिल्लीतील लाल किल्ल्यावर दाखल होत तिरंगा ध्वज फडकवला. यावेळी मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून उपस्थितांना हात दाखवत अभिवादन केले. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून ‘भारत माता की जय’ म्हणत भाषणाला सुरुवात केली. स्वातंत्र्यप्रेमींना वंदन करण्याचा आजचा दिवस असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिकांना आम्ही मनापासून अभिवादन करतो, असे म्हटले. या भाषणात त्यांनी जनतेची सेवा करण्याचा आमचा संकल्प आहे, असे सांगितले. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी पहाटे राजघाटावर पोहोचून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावर पोहोचले, तिथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर पोहोचून महात्मा गांधींना पुष्पहार अर्पण केला. बघा व्हिडिओ…