PM Modi Speech | Uncut Speech | संत रामानुजाचार्य यांनी जगाला समानतेचा विचार दिला – मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी अर्थात जगद्गुरू रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं. यावेळी मोदी यांनी उपस्थितांना संबोधित करताना देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या. या शुभ दिनी रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचं लोकार्पण होत आहे. रामानुजाचार्य यांचं ज्ञान जगासाठी मार्गदर्शक ठरावं, अशी अपेक्षा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी अर्थात जगद्गुरू रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं. यावेळी मोदी यांनी उपस्थितांना संबोधित करताना देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या. या शुभ दिनी रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचं लोकार्पण होत आहे. रामानुजाचार्य यांचं ज्ञान जगासाठी मार्गदर्शक ठरावं, अशी अपेक्षा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. रामानुजाचार्य यांच्या विशाल मूर्तीच्या रुपाने भारत मानव ऊर्जा आणि प्रेरणांना मूर्त रुप देत आहे. रामानुजाचार्य यांची ही प्रतिमा त्यांचं ज्ञान, वैराग्य आणि आदर्शांचं प्रतिक आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
आज रामानुजाचार्य यांची विशाल मूर्ती स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या रुपात आपल्याला समानतेचा संदेश देत आहे. हाच संदेश घेऊन आज देश ‘सबका साथ, सबका विश्वास और सबका प्रयास’ हा मंत्र घेऊन आपल्या नव्या भविष्याचा पाया रचत आहे. आजपासून 1 हजार वर्षापूर्वी रुढी-पंरपरा आणि अंधविश्वासाचा पगडा किती मोठा असेल. मात्र त्यावेळी रामानुजाचार्य यांनी समाजातील सुधारणांसाठी समाजाला भारताच्या खऱ्या विचारांची ओळख करुन दिली, असं मतही मोदींनी यावेळी व्यक्त केलं.