PM Narendra Modi : दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Modi On Pahalgam Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील जाहीर सभेत या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
दशतवाद्यांची ओळख पटवून त्यांना धडा शिकवू. दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही. प्रत्येक दहशतवाद्यांना धडा शिकवू. मृत झालेल्या लोकांना आम्ही न्याय देऊ, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर बोलताना म्हंटलं आहे. प्रत्येकाची मानवतेवर विश्वास आहे, ते आमच्यासोबत आहे. अनेक देश आमच्यासोबत उभे राहिले आहेत. मी त्यांचे आभार मानतो. शांती आणि सुरक्षा गतिमान विकासाची ओळख आहे, असंही यावेळी बोलताना मोदींनी सांगितलं.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, 22 तारखेला दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे मारलं. त्यामुळे संपूर्ण देश व्यथित आहे. कोटी कोटी देशवासी दुखी आहेत. सर्व पीडित परिवारांच्या दुखात संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे. ज्या कुटुंबातील अधिक इलाज चालू आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आपला आक्रोश एक सारखा आहे. पर्यटकांवरच हल्ला झाला नाही. देशाच्या दुश्मनांनी देशाच्या आत्म्यावर हल्ला केला आहे. मी स्पष्टपणे सांगतो, ज्यांनी हा हल्ला केला आहे, त्या दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचं षडयंत्र रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा दिली. आता दहशतवाद्यांना मातीत घालण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आतंकीच्या आकांची कंबर तोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी मोदींनी दिला आहे.

'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी

सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा

लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?

दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
