VIDEO : PM Narendra Modi In Pune | Mula Mutha River साठी पुण्यात PM Modi यांची मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यातील विविध विकास प्रकल्पाचं लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यानंतर त्यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. मोदींनी यावेळी तिकीट काढून उपस्थित मान्यवरांसह आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यातील विविध विकास प्रकल्पाचं लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यानंतर त्यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. मोदींनी यावेळी तिकीट काढून उपस्थित मान्यवरांसह आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी युवा विशेषतः दिव्यांग मुला-मुलींशी संवादही साधला. तसेच मुळा-मुठा नदीच्या सुशोभिकरणाच्या प्रकल्पाचंही लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी पुणेकरांना मेट्रोने प्रवास करण्याची सवय लावून घ्या असं आवाहन केलं. तसेच स्वच्छतेचं महत्त्वही पटवून देत केंद्र सरकारने सुरू केलेला विकासाचा रोडमॅप पुणेकरांसमोर मांडला. विकास कामांच्या भूमीपूजनावरून काँग्रेसला चिमटे काढतानाच मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोसाठी घेतलेल्या परिश्रमाचं मोदींनी कौतुकही केलं.